Kitabı oku: «गैरसमज»

Yazı tipi:

अनुक्रमणिका

 समर्पणआभारप्रेरणादायक उद्धरणेअनुक्रमणिका1 पर्यायहीन2 वाढती जागृती3 आईचा छोटासा मदतनीस4 प्रेरणा5 शेजारी6 मेगनचे मित्र1 श्री. ली यांच्यावरील संकट

गैरसमज

एक मादर्शक आत्मा, एक वाघाचे भूत आणि एक भितीदायक आई!

ओवन जोन्स

द्वारा

अनुवादक: विक्रम चिंचाेलीकर

कॉपीराइट © 2021 ओवन जोन्स

गैरसमज

5वे संस्करण

ओवन जोन्स द्वारा

मेगन प्रकाशन सेवा

द्वारा प्रकाशित

https://meganthemisconception.com

या कार्याचे लेखक म्हणून ओळखले जाणारे ओवन जोन्स यांचा हक्क कॉपीराइट डिझाइन आणि पेटंट ऍक्ट 1988 च्या कलम 77 आणि 78 नुसार ठामपणे मांडला गेला आहे. लेखकाचा नैतिक अधिकार ठामपणे मांडला गेला आहे.

कल्पित साहित्याच्या या कार्यात, पात्र आणि घटना एकतर लेखकाच्या कल्पनेचे उत्पादन आहेत किंवा ते पूर्णपणे काल्पनिकपणे वापरले गेले आहेत. काही ठिकाणे अस्तित्वात असू शकतात, परंतु घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत.

माझ्याशी येथे संपर्क साधा:

http://facebook.com/angunjones

http://twitter.com/owen_author

owen@behind-the-smile.org

http://owencerijones.com

अंतर्गत माहितीसाठी आमच्या वृत्तपत्रात सामील व्हा

ओवन जोन्स' पुस्तके आणि लेखन यावर

आपला ईमेल पत्ता येथे प्रविष्ट करून:

http://meganthemisconception.com

याच मालिकेतील अन्य कादंबऱ्या:

मेगन मालिका

एक मार्गदर्शक आत्मा, एक वाघाचे भूत आणि एक भितीदायक आई!

गैरसमज

मेगनचे तेरावे वर्ष

मेगनची शालेय सहल

मेगनची शालेय परीक्षा

मेगनचे अनुयायी

मेगन आणि हरवलेली मांजर

मेगन आणि महापौर

मेगनची उपहासासह झुंज

मेगनच्या आजी-आजोबांची भेट

मेगनचे वडील आजारी पडतात

मेगन सुट्टीवर जाते

मेगन आणि चोर

मेगन आणि सायकलस्वार

मेगन आणि वृद्ध महिला

मेगनची बाग

मेगन प्राणिसंग्रहालयात जाते

मेगन गिर्यारोहणावर जाते

मेगन आणि डब्ल्यू. आय. पाककला स्पर्धा

मेगन सवारीला जाते

मेगन नौकाविहारावर जाते

मेगन आनंदोत्सवामध्ये

मेगन ख्रिसमसमध्ये

1 समर्पण

ही आवृत्ती माझी पत्नी प्रणोम जोन्स जिने माझे जीवन शक्य तितके सोपे केले, तिचे कार्य चांगल्यारीतीने पार पाडले, माझे पालक, कोलिन आणि मेरियन ज्यांनी मला व माझ्या भावांना अद्भुत संगोपन दिले, यांना समर्पित आहे.

कर्मा प्रत्येकाला योग्य परतफेड करेल.

1 आभार

तिच्या संयमासाठी, माझ्या पत्नी प्रणोमचे आणि कव्हर डिझाइनमध्ये मदत केल्याबद्दल माझे मित्र लॉर्ड डेव्हिड प्रोसर यांचे.

1 प्रेरणादायक उद्धरणे

"तुम्ही केवळ ऐकले म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका,

बऱ्याच जणांनी बोलले आणि पसरवले होते म्हणून केवळ कशावरही विश्वास ठेवू नका,

केवळ तुमच्या धार्मिक ग्रंथात लिहिलेले आहे म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका,

केवळ शिक्षक व वडिलधाऱ्यांच्या परवानगी वर अवलंबून कशावरही विश्वास ठेवू नका,

पिढ्यानपिढ्या चालत आहेत म्हणून परंपरांवर विश्वास ठेवू नका,

परंतु निरीक्षण आणि विश्लेषणानंतर काही जर युक्तिवादाने मान्य असेल आणि एखाद्याच्या आणि सर्वांच्या भल्यासाठी हितकारक असेल तर ते स्वीकारा आणि ते आचरणात आणा."

गौतम बुद्ध

------

महान आत्मा, ज्यांचा आवाज वाऱ्यावर पसरला आहे आणि म्हणतो, माझे ऐका. मला शक्ती आणि ज्ञानात वाढू द्या.

मला लाल आणि जांभळे सूर्यास्त सदैव पाहू द्या. आपण मला दिलेल्या गोष्टींचा माझ्या हातांनी आदर करावा.

प्रत्येक पान आणि दगडाखाली लपलेले रहस्य मला शिकवा कारण आपण अनादी काळापासून लोकांना शिकवत आहात.

मला माझ्या सामर्थ्याचा वापर करू द्या, माझ्या भावापेक्षा मोठे व्हायला नव्हे तर स्वतःच्या सर्वात मोठ्या शत्रूसह – स्वतः लढण्यासाठी.

मला आपल्या पुढ्यात सदैव स्वच्छ हात आणि उघड हृदय घेऊन येऊ द्या, जेणेकरून जेव्हा माझे पृथ्वीवरील जीवनकाल सूर्यास्ताप्रमाणे मावळेल तेव्हा माझा आत्मा आपल्या पुढ्यात शरमेविना परत येईल.

(पारंपारिक सिओक्स आदिवासी प्रार्थनेवर आधारित)

1 अनुक्रमणिका

1 पर्यायहीन

2 वाढती जागृती

3 आईचा छोटासा मदतनीस

4 प्रेरणा

5 शेजारी

6 मेगनचे मित्र

नाकारलेले

1 1 पर्यायहीन

रडकुंडीला आलेली मेगन कोळशाच्या तळघरात पुन्हा बंद करण्यात आली होती. ती फक्त बारा वर्षांची होती आणि तिला समजले नाही की तिची आई तिच्याशी असे भयंकर गोष्टी का करते. हे आधी अनेक वेळा घडले होते, पण तिच्या समजुतीप्रमाणे, तिच्या वडिलांना याबद्दल काहीही माहित नव्हते. तिने त्यांना कधीही सांगितले नव्हते आणि तिला खात्री होती की तिच्या आईने देखील कधीच काही सांगितले नसावे.

तिच्यात आणि तिच्या आईमध्ये एकमेकांना खालती पडू द्यायचे नाही असा एक अबोल करार झाला होता, परंतु इथे ती पुन्हा तळघरात बसली होती, धुळीत आणि घाणीत, कोण जाणे कुठले भयानक जीव तिच्यावर डोळा ठेवून होते.

तिला माहित नव्हते. तिथे गडद अंधार होता आणि स्वतःला रडण्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि तिच्या आईला तिला सोडण्याची विनंती करण्यासाठी तिला सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. मात्र इतर प्रसंगी तिने हा प्रयत्न केला होता आणि तिच्या आईच्या तिच्या सुटकेच्या अटी म्हणून अवास्तव मागण्या होत्या. अटी ज्या तिला माहीत होत्या की तिने कितीही प्रयत्न केला तरी ती त्या पूर्ण करू शकत नाही.

कधीकधी असे दिसत होते की तो करार गंभीरपणे घेणारी ती एकटीच होती.

या व्यतिरिक्त, तिच्या गालावरून अश्रूंनी परत वाहणे सुरू केले, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील धुळीतून अदृश्य नदी-पात्र तयार झाले होते जे तिच्या शाळेच्या गणवेषावरील कोळश्याच्या धुळीला धुऊन काढत होते. ते अती होते, खरंच अती होते. कोणीतरी जी तिला इतकी चांगली समजू शकत होती, तिच्या एकुलत्या एक मुलीबरोबर इतक्या क्रूरतेने कसे वागू शकत होती?

जेव्हा तिथून जात असताना तिच्या आईने स्वेच्छेने व्हॅक्यूम क्लीनरने दाराला जोरदारपणे धडक दिली तेव्हा मेगनने नकळत उडी मारली. तिथे हलकीशी प्रकाशाची झोत देखील नव्हती जिथून आशा निर्माण होईल. म्हणून तिने तिला जे मदतीचे वाटले ते केले आणि कोळश्याच्या ढीगाला भिंतीपर्यंत आणि नंतर तिच्या उजवीकडे कोपरा सापडेपर्यंत ढकलले.

तेथे, तिने आपल्या परकराला काही सरपटत वर न चढो म्हणून आपल्या पायांभोवती गुंडाळले आणि स्वतः खाली दुमडून ठेवले. तिने तिच्या ब्लाउजवरील सर्व बटणे लावलीत, मोजे वर खेचले, स्वेटर डोक्यावर खेचले आणि हात तिच्या बाह्यांच्या आत ओढले. हे, मेगनला माहित होते की कोळशाच्या तळघरात तिथे असलेल्या जिवांपासून सुरक्षित राहणे अश्याप्रकारे सर्वात सुरक्षित होते. भूत आणि त्यासारख्या गोष्टींबद्दल तिला काळजी नव्हती, पण खरेतर खरी समस्या तीच होती, परंतु तिला तिच्यावर किडे रांगलेले आवडत नव्हते आणि किड्यांद्वारे चावले जाणे आणि त्यांच्याद्वारे रक्त बाहेर काढल्या जाणे याचा विचारही ती सहन करू शकत नव्हती. तिला कोळींचा देखील तिटकारा होता, परंतु तिच्या शाळेच्या गणवेशाच्या कोशामध्ये लपेटलेल्या तिला, माहित होते की सरपटणाऱ्या किटकांना सापडेल अशी केवळ काही इंचांची चमडी उघडी होती. बाजूंना अचूकपणे काही चौरस इंच उघडे होते, कारण तिच्या हातांनी तिच्या पोटरींना मांड्यांशी घट्ट ओढून धरले होते.

तिची इच्छा होती की तिचे विव्हळणे थांबावे. अगदी थोड्या वेळासाठी, पण तिला माहित होते की अखेरीस ती मुक्त होण्याची वाट पाहत असताना तेही होईल. तिला हे देखील माहित होते की ते कधी होईल - सुमारे साडे पाच वाजता, जेव्हा वडिलांच्या कामावरून घरी येण्यापूर्वी तिला स्वच्छ होण्यासाठी अर्धा तास दिला जाईल.

तिची आई हे का करीत आहे हे मेगनला समजले. याचे कारण असे की ती घाबरलेली होती आणि मेगन नव्हती. तिची आई तिच्या मुलीसाठी घाबरलेली होती आणि म्हणून तिला मेगनला तिच्यासारखे घाबरवायचे होते. समस्या अशी होती की मेगन घाबरत नव्हती आणि घाबरण्यासारखे तिला त्यात काहीही दिसत नव्हते. तिने तिच्या आईला शेकडो वेळा समजावून सांगायचा प्रयत्न केला, परंतु तिने तिला केवळ एकतर लाक्षणिकरित्या किंवा वास्तवात आत्तासारखे गप्प केले.

तिचे आईवडील दोघेही कॅथोलिक होते, पण तिची आई खूप कट्टर कॅथोलिक होती आणि तिचे वडील काहीसे कमी होते. तिची आई भविष्याबद्दल चिंतित होती, व असे तिचे म्हणणे होते, पण स्वतःसाठी नाही, कारण ती स्वतः ला एक चांगली कॅथोलिक समजत होती आणि तिला खात्री होती की जोपर्यंत ती आपली कर्तव्य बजावत आहे तोपर्यंत स्वर्गात तिचे स्थान आधीच निश्चित आहे. जिथपर्यंत मेगनचा प्रश्न होता, तिच्या आईचा विचार होता की तिच्या मुलीला कोळशाच्या तळघरात बंदिस्त करणे तिच्या कर्तव्याचा एक भाग आहे, आणि म्हणूनच ती आता तिथे होती.

तिच्या वडिलांचा जन्मदेखील कॅथोलिक धर्मात झाला होता, परंतु ते तिच्या आईसारखे कट्टर नव्हते. त्यांचा असा विश्वास होता की जर लोक स्वर्गात चिरंतन शिक्षेची जोखीम घेण्यास इच्छित असतील तर ते त्यांच्या स्वतःवर अवलंबून असते. ते स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्यायचे, परंतु त्यांचा काही प्रमाणात मोकळीक असण्यावर विश्वास होता, लहान मुलींसाठी सुद्धा.

तिच्या आईने तिच्याशी जे केले ते असूनही मेगन तिच्या आईवडिलांवर खूप प्रेम करत होती, कारण लहान असूनही तिला समजले की तिच्या आईला तिच्याबद्दल हृदयामध्ये स्वारस्य होते. तिने दोघांवरही समानतेने प्रेम करण्याचा प्रयत्न केला, परंतु मेगनच्या मते ही समस्या अशी होती की तिच्या आईला एकतर चांगले शिक्षक मिळाले नव्हते किंवा ती स्वतःच्या डोळ्यावर, कानांवर किंवा इंद्रियांवर विश्वास ठेवण्यास खूप भीत होती.

ते काय आहेत हे तिला ठाऊक नव्हते, तिला फक्त हे माहित होते की ते तिला होत होते आणि म्हणून सगळ्यांना होत होते, परंतु तिच्या आईला ते मान्य नव्हते आणि म्हणूनच तिची आई इतरांनाही ते होते यावर विश्वास ठेवण्यास इच्छित नव्हती. 'शेवटी', तिच्या आईने तिला सांगितले होते, 'मी चौतीस वर्षांची आहे आणि तू केवळ बारा वर्षाची. मी कॅथोलिक शाळेत शिकले आहे, तर तू आता केवळ अंतरधर्मीय सर्वसमावेशक शाळेत जाते'.

तिच्या आईला बहुधा सर्वसमावेशक शालेय प्रणालीसह काहीच अडचण नव्हती, परंतु तिने 'अंतरधर्मीय' हा शब्द ओकला होता. मेगनला ही समस्या कधीच समजली नव्हती. ती चांगल्या आणि वाईट अशा बहुतेक धर्मांमधून दोघांनाही भेटली होती, चतुर आणि मूर्ख आणि सावध आणि बेसावध.

तिची आई ह्रदयात चांगली, हुशार आणि बऱ्यापैकी सावध श्रेणींमध्ये येत होती.

तिचे वडील चांगले, हुशार आणि बऱ्यापैकी सावध होते.

मेगनने स्वतःला चांगले, वाजवी हुषार आणि खूप जाणीव असल्याचे मुल्यांकीत केले.

तीच तिची समस्या होती. म्हणूनच तिला कोळशाच्या तळघरात कोपऱ्यात अडकवले होते ज्यामुळे सर्व प्रकारच्या गोष्टी कदाचित तिच्या अगदी उजव्या बाजूस रेंगाळत होत्या. या विचाराने तिचा थरकाप उडाला होता, पण ते रडणे आता थांबले होते जे की तिला अखेरीस होणार आहे हे माहीत होते.

तिला माहित होते की तिच्याकडे दोन पर्याय होते.

आपल्या वडिलांना त्यांच्या पाठीमागे काय होत आहे हे सांगू शकत होती ज्यामुळे घटस्फोट झाला असता किंवा तिची काळजी घेतली गेली असती किंवा ती सामान्यपणे अवलंबिल्याप्रमाणे अजाण असल्याचे भासवू शकत होती.

मेगन हे शिकली होती की जेव्हा तिला तळघरात बंद केले जात असे तेव्हा करण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर कशाचा तरी विचार करणे आणि विचार करण्याबाबत तिचा सर्वात आवडता विषय म्हणजे तिचे मित्र होते. तिचे जास्त मित्र नव्हते पण ते तिच्यासाठी खास होते. तिचे आवडते मित्र तिचे आजोबा, वाकिनहिन्शा आणि तिची पाळीव मांजर होते.

तिने तिचे डोळे मिटले, विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला आणि ते तिच्या समोर उभे असल्याची किंवा तिच्या शेजारी बसून असल्याची कल्पना करण्याचे प्रयत्न करू लागली. यामुळे तिला नेहमीच उबदार वाटायचे आणि म्हणून जेव्हा ती अस्वस्थ असायची तेव्हा ती हे करत असे. जेव्हा आयुष्य अन्यायकारक वाटतं असे तेव्हा त्याचा सामना करण्याची ही तिची एक छोटीशी युक्ती होती.

मेगनला तिच्या मांडीला काहीतरी घासत आहे असे वाटले आणि एक क्षीण आवाज ऐकला जो तिच्या स्वेटरमध्ये गुंडाळल्या गेला होता.

ती क्षणभर गोठली.

1 2 वाढती जागृती

हे सर्व तेव्हा सुरू झाले जेव्हा ती एक लहान चिमुकली होती. दिवसा तिला तिच्या आजीकडे (नानी) सोडल्या जात असे कारण तिचे आईवडील दोघे काम करत असे. तिचे आईचे आईवडील पारंपारिक प्रकारचे होते, जिथे नवरा कामावर जात असे आणि पत्नी घरीच राहत असे आणि घरी जे काही मिळेल ते घरगुती काम करत असे जिथे घरात आधीच लग्न झालेली मुले घर सोडून जात असे. श्रीमती व्हाईट यांचे स्वतःचे असे मित्र कधीही नव्हते. त्यांना माहित असलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पतीचे एक मित्र किंवा मित्राची पत्नी होती आणि म्हणूनच जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा श्रीमती व्हाईट यांचे अक्षरशः कोणतेही मित्र नव्हते.

बऱ्याच वेळा, श्रीमती व्हाईट यांना असे वाटायचे की त्या कंटाळवाणेपणा आणि एकाकीपणामुळे वेड्या होतील.

म्हणून दिवसा आणि कधीकधी रात्री देखील काळजी घेण्याकरिता मेगनचे असणे म्हणजे एक भाग्य होते. श्रीमती व्हाईटला बऱ्याच लोकांना सांगायचे होते की यामुळे तिला कंटाळवाणेपणा पासून वेड लागण्याचे थांबले आहे, परंतु बऱ्याच वर्षांनंतर, मेगनला बहुतेकदा आश्चर्य वाटले की तिने प्रक्रिया सुरू होण्यापासून थांबवण्यासाठी पोहोचण्यास उशीर तर केला नाही?

काहीतरी चुकीचे होते याचा पहिला संकेत म्हणजे जेव्हा मेगन बाळ होती. मेगनने खेळणी आणि गोष्टी तिच्या डाव्या हाताने उचलण्यास सुरवात केली, जो श्रीमती व्हाईटसाठी अतिशय वाईट संकेत होता. सुरुवातीला, श्रीमती व्हाईट केवळ ती वस्तू मेगनच्या उजव्या हातात हस्तांतरित करायची आणि म्हणायची, 'डावा हात वाईट, उजवा हात चांगला', परंतु कित्येक आठवड्यांनंतर, जेव्हा मेगन अद्याप गोष्टी करण्याचा योग्य मार्ग शिकली नव्हती, तेव्हा तिला डाव्या हातावर एक थाप मिळाली त्याचबरोबर डावा हात खराब असल्याची ताकीद ही मिळाली.

त्या वयातील कोणत्याही मुलाप्रमाणे, अशा कठोर पाव्हलोव्हियन प्रशिक्षणानंतर, मेगनने तिचा उजवा हात वापरायला शिकले. मेगन तिच्या प्रशिक्षणास कसे प्रतिसाद देत आहे यावर तिची आजी नेहमीच खूश होती, म्हणून एके दिवशी तिने तिच्या मुलीला विजयाने आनंदाची बातमी जाहीर केली, जिच्या लक्षात आले नाही की मेगन आता सर्व गोष्टी उचलण्यासाठी विशेषतः तिचा उजवा हात वापरत आहे, तर पूर्वी ती डावा हात वापरत होती.

मेगनची आई सुझानने याबद्दल काहीही विचार केला नव्हता. तिला माहित होते की तिच्या आईकडे काही 'खास छोटे' मार्ग आहेत आणि तिने तिला त्याना अंमलात आणण्याची परवानगी दिली. तथापि, तिला जे आठवत नव्हते ते म्हणजे तिच्या आईने तिच्यावर देखील या साऱ्याचा प्रयोग केला होता आणि जर केला नसता तर ती एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती असती. सुरुवात म्हणजे ती डावखोरी असती.

सुझानने तिचा नवरा, रॉबर्टला सांगितले नाही की मेगनचा जन्म तिच्या डाव्या हाताचा वापर करण्याच्या प्रवृत्तीसह झाला आहे, तसेच तिच्यापासून त्यास 'मारहाण' करून बाहेर काढले असते, कारण स्वतः तो डावखोरा असल्यामुळे आणि अशा जुन्या अंधश्रद्धांमुळे बरेच काही सहन केल्यामुळे, त्याने त्यास मान्यता दिली नसती. श्रीमती व्हाईटने रॉबर्टला नकार दिल्याचे एक कारण म्हणजे तो डावखुरा होता, परंतु तिने विचार केला की त्याला व त्याच्या आत्म्याला वाचविण्यास आता फार उशीर झाला आहे.

सुझानचे प्रेमात पडणे आणि त्यानंतर रॉबर्टसह लग्न करणे कठीण करण्यासाठी तिने तिच्या क्षमतेतील सर्व गोष्टींचा प्रयत्न केला होता. तिने तिला बजावले, तिला बाहेर जाण्यास मनाई केली, तिला खर्चासाठी पैसे देणे थांबविले आणि तिला पायऱ्यांखालील झाडूच्या कपाटातही बंदिस्त केले होते.

“माझा विश्वास नाही बसत की माझी मुलगी तुझ्यासारखी वागू शकते”, ती जात असताना ती कपाटचे दार आपटत अनेकदा ओरडत असे. "मला वाटते हॉस्पिटलमध्ये काहीतरी अदलाबदल झाली असावी. तुझ्यासारखी मुलगी मला असू शकत."

सुझान भाग्यवान होती. तिच्या घरी कोळश्याची खळगी नसून त्यांच्याकडे कोळश्याचा साठा होता, परंतु तिला झाडूचे कपाट किशोरवयीन असताना सारखेच भयानक वाटत होते, आणि याच कारणांव्यतिरिक्त मेगनला ते आवडले नाही कारण श्रीमती व्हाईट यांनी आपल्या मुलीला सांगितले होते की तेथे कदाचित 'भूत आणि सैतान' आहेत. तिने अशा प्रसंगी सुझानला कोपऱ्यात शांतपणे बसून आपले डोके झाकण्याचा सल्ला दिला होता, 'जेणेकरून भुतांना आणि सैतानांना ती दिसणार नाही'.

मेगन बोलायला शिकल्यामुळे श्रीमती व्हाईट यांनी त्यास वैयक्तिक विजय मानले. तिने सुझान किंवा रॉबर्टला या बाबतीत अजिबात श्रेय दिले नाही, आणि आपल्या मित्रांना सांगितले की अश्या तथाकथित 'आधुनिक पालकांना' त्यांच्या मुलांसाठी वेळ नाही आणि जर त्यांच्या आजी-आजोबांनाही नसेल तर पुढची पिढी ही 'मूर्ख' बनेल.

श्रीमती व्हाईटच्या बहुतेक परिचितांना ती कशी आहे हे माहित होते आणि एकतर ते होकारार्थी मान डोलायचे, विषय बदलायचे किंवा घाईघाईने निघून जायचे, जर तो पर्याय असला तर. संभाषणे बऱ्याचदा या ओळी असायच्या:

"आहो, श्रीमती व्हाईट, मला खात्री आहे की आपण लहान मेगनचा सांभाळ करून आपल्या मुलीला मदत करण्याचे एक मोठे कार्य करत आहात... यावर्षी बेगोनिया (फुलझाडे) कशी आहेत?"

आणि असे, छोट्या मेगनला तिच्या आजीच्या बेबंद गोष्टींबरोबर सोडण्यात आले, कारण श्री. व्हाइट यापुढे तिच्या कल्पनांना आळा घालण्यासाठी हयात नव्हते, तरीही असे दिसत होते की हे पूर्णपणे खरे नव्हते. श्रीमती व्हाईटच्या पायांजवळ बसलेली असताना मेगन कधीकधी एखादे खेळणे काढून 'आजोबांना' देत असे.

सुरुवातीला, श्रीमती व्हाईटला वाटले की मूल गोंधळलेले आहे. 'इतर आजी-आजोबा' ती आजून शिकत आहे असे समजतात हे तिच्या लक्षात आले आणि या युक्तीने आधी काम केले हे जाणून, जेव्हाजेव्हा मेगन 'आजोबा' म्हणून एखादे खेळणे उचलायची तेव्हा ती ते घ्यायची आणि म्हणायची, "आजी". नंतर, अधिक हताश होऊन म्हणायची, 'आजी, मेगन, आजोबा नव्हे!' आणि तिला पायावर एक चापटी द्यायची.

Ücretsiz ön izlemeyi tamamladınız.

₺109,87

Türler ve etiketler

Yaş sınırı:
0+
Litres'teki yayın tarihi:
26 ocak 2021
Hacim:
60 s. 1 illüstrasyon
ISBN:
9788835416869
Telif hakkı:
Tektime S.r.l.s.
İndirme biçimi:
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre
Metin
Ortalama puan 0, 0 oylamaya göre